जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल

0
20

वाशिम, दि. १८ :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वाशिम जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने सन २०१८-१९ या वर्षात आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात आला आहे. तरी या बदलाची नोंद संबंधित खेळाडूंनी घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलांची शालेय बुध्दिबळ स्पर्धा दि. ६ सप्टेंबर रोजी तर याच वयोगटातील मुलींची बुध्दिबळ स्पर्धा दि. ७ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे होईल. १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींची शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा दि. ४ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. तसेच १४,१७ व १९ वर्षे वयोगटातील मुलांची शालेय बॅडमिंटन स्पर्धा दि. ११ सप्टेंबर रोजी तर याच वयोगटातील मुलींची बॅडमिंटन स्पर्धा दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. सुधारित तारखेनुसार संबंधित खेळाडूंनी स्पर्धास्थळी सकाळी ९ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.