मुख्य बातम्या:

तायक्वांडो स्पर्धेत देवरीच्या योजनला स्वर्णपदक

देवरी, दि.19- गोंदिया येथे नुकत्याच पार पडलेल्या 13व्या जिल्हा स्तरिय तायक्वांडो स्पर्धेत देवरीेच्या योजन  कावळे याने सुवर्णपदक पटकावले.

गोंदिया येथे नुकत्याच 13 व्या तायक्वांडो क्रीडा स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन  केले. यामध्ये योजन धनवंतराव कावळे या विद्यार्थ्याने स्वर्णपदक तर विनित कमलेश पालीवाल या विद्यार्थ्यांने कास्यपदक पटकाविले. यो दोन्ही बालकांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या माता-पित्यांसह आपले शिक्षक आणि प्रशिक्षक स्वप्नील ठाकरे, अमित मेश्राम व पुरुषोत्तम बागडे यांना दिले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी तालुक्याचा मान वाढविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Share