मुख्य बातम्या:

कार शिरली पानटपरीत

भंडारा,दि.20 : राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणारी कार एका पानटपरीत शिरल्याची घटना शहरालगतच्या कारधा येथे रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी या कारमधून ७०७ दारू बॉटल जप्त केल्या.
नागपूरहून रायपुरकडे निघालेली भरधाव कार (सीजी ०७ एम २३८२) रविवारी दुपारी अचानक कारधा येथील एका पानटपरीत शिरली. काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेने त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या कारमधून पोलिसांनी ७०७ बॉटल दारू जप्त केली. त्याची किंमत ५६ हजार रुपये आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी ही दारु कुठून आणली आणि कुठे घेऊन जात होता याचा तपास पोलीस करीत आहेत. भरदिवसा भरवस्तीतील पानटपरीत कार शिरल्यानंतर त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती

Share