घराचे छत पडुन ढिगार्याखाली दबुन तिघांचा मृत्यू

0
10

भंडारा,दि.21ः-जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटात सापडलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून धरणातील पाणी साठय़ात वाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.त्यातच कालपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजिवनही विस्कळीत झाले असून जवाहरनगर परिसरातील राजेदहेगाव येथे घराचे छत पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारला (दि.21) उघडकीस आली आहे.
सविस्तर असे की, राजेदहेगाव येथील पोलीस पाटील मधुकर ढोबळे यांच्याकडे शेतीच्या कामासाठी वाषींक रोजंदारीवर काम करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील निलज खंडाळा येथील शेतमजूर निवासी मुक्कामी होते.दरम्यान कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे ते ज्या घरात वास्तव्यास होते.त्या घराचे छत रात्रीच्या सुमारास ते गाढ झोपेत असताना पडल्याने त्यात दबून सुकरू दामाजी खंडाते,पत्नी सारीका सुकरु खंडाते आणि 3 वर्षीय मुलगी नंदीनी सुकरु खंडातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांना माहिती देण्यात आली असून जिल्हाप्रशासनाच्या अधिकार्यानीही घटनास्थळी भेट दिली आहे. भंडारा जिल्ह्यात रात्रीपासून सतत पाऊस सुरु असून सर्वच तालुक्यात अतिवृष्ठी झालेली आहे.भंडारा,मोहाडी व लाखनी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.अतिवृष्टीमुळे जिल्हाप्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.