सावकाराकडे गहाण ठेवलेले सोने परत मिळविण्यासाठी शेतकरी पिता-पुञाचे उपोषण

0
11

नांदेड,दि.21ः-शेतीकामासाठी आर्थिक अडचण असल्याने सन् 2005 व सन् 2006 मध्ये गहाण ठेवलेले सोने उचल व नियमितपणे व्याजभरणा केल्यानंतरही परत मिळत नसल्याने ते परत मिळविण्यासह संबधित दोषी खाजगी सावकारावर कारवाईसाठी हिप्परगा (जा.)येथिल शेतकरी पिता-पुञाने नांदेडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर आजपासून भर पावसामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे.
अधिक माहिती अशी की,नायगांव तालुक्यातील मौजे हिप्परगा (जा.) येथिल शेतकरी माधवराव कदम यांचे कुटूंबात सात एकर शेती असून त्यांनी खाजगी सावकार भानुदास मनोहर तांदळीकर यांचे मालकीचे श्री.साई ज्वेलर्स,नायगांव बा.येथे सन् 2005 व 2006 मध्ये स्वतःच्या घरातील सोने गहाण ठेवून आपल्या शेतीसाठी बि-बियाणे साठी रक्कम उचल करून उचल व त्या रक्कमेचा नियमित व्याजासह भरणा केल्यानंतरही संबधित खाजगी सावकाराने सदर बाबीचा वेळोवेळी हिशोब मागणीनंतरही हिशोब केला नाही व गहाण ठेवलेले सोने परत केले नाही.त्यामूळे,सहाय्यक निबंधक तथा सावकारीय सहाय्यक निबंधक, ता.नायगांव(खै.)यांना दि.14ऑगस्ट 2017 रोजी तक्रार केल्यानंतरही त्यांचेस्तरावरून कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे निवेदनात नमूद करित जिल्हाधिकारी, नांदेड कार्यालयासमोर आज दि.20ऑगस्ट पासून माधवराव कदम व मारोती कदम या शेतकरी पिता-पुञांनी भर पावसामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतिने जिल्हा निबंधक,सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक,नांदेड यांना दि.10 ऑगस्ट 2018 रोजीच या प्रकरणात सविस्तर चौकशीसह कार्यवाहीबाबत आदेशित करण्यांत आले होते परंतू, त्यांच्यास्तरावरून कोणतीही कार्यवाही करण्यांत आलेली नसून गत अनेक वर्षांपासून शेतीमध्ये पिकांची बरोबर उगवन नाही व मालाला भावही नाही त्यातच गहान असलेले सोने उचल व नियमित व्याज भरूनसुद्धा मिळत नसल्याने सदर खाजगी सावकार आपणांस आत्महत्येसाठी प्रवृत्त करित असल्याची भावना पिडीत उपोषणार्थी शेतकरी पिता-पुञांनी व्यक्त केली.