प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूलतर्फे आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा

0
15

गोदिया,दि.22ः-येथील श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेव्दारे संचालित प्राग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय बुद्धिबळ स्पधेर्चे आयोजन प्रोग्रेसिव्ह कॉन्वेट सिव्हिल लाईन येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश बारई होते. शिक्षण संस्थेचे डॉ. पंकज कटकवार सचिव डॉ. निरज कटकवार यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. या बुध्दीबळ स्पर्धेत एकूण १५0 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात विविध गटातून ज्ञानेश्‍वरी गंगाधरे, रांगीनी सिंहमारे, दिपाली इळपाचे, ओम बिरणवार, राज पुसाम, मानस बुध्दे, शीतल पुसाम, जयश्री लिल्हारे, पल्लवी भांडारकर, जय वरखेडे, अमित रचा, अर्पणा मेर्शाम, प्रणीता गेडाम, इशांत खोब्रागडे, खुशाल येरणे या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मुकेश बारई यांनी शाळेचा उपक्रम व विद्यार्थ्यांच्या गुणवंताचे कौतूक करुन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तर संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार व सचिव डॉ. निरज कटकवार यांनी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा कटीबध्द असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी विविध खेळप्रकारात मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन केले. आयोजनासाठी प्राचार्य ओ.टी. रंहागडाले, कुमुदिनी तवाडे, वर्षा सतदेवे, कल्याणी रहागडाले, सुनील कटरे, सुशील मेर्शाम, सतीश मोटघरे, नितीन पशीने, तनिक कुबडे, हेमा नायडू , खुशबू बांगडकर, राजेन्द्र कनौजिया, सिमरन बास्के यांनी परिश्रम घेतले