तलाठी कार्यालये उपेक्षीतच

0
8

गोरेगाव,दि.22-  येथील तहसील कार्यालयाअंतर्गत तीन राजस्व मंडळातील 21 सज्ज्यात 18 तलाठ्याव्दारे 99 गावातील 10 हजार खातेदारांचे जमिनीचे दस्ताऐवज आहेत. या कार्यालयाची इमारत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी कार्यालये असल्याने महत्वाचे शेतकऱ्यांचे पुरावे नष्ट होण्याची भिती या खातेदारांना सतावत आहे.राज्य शासनांनी तलाठी यांना कामे सुरळीत करता यावे म्हणुन संगणक दिले आहेत. परंतु, हे संगणक नादुरुस्त पडलेले आहेत. स्वतःची कार्यालये नसल्याने पळवित, समाजमंदीर, खाजगी भाड्याच्या खोलीत शेतकऱ्यांचे 7/12, नमुना 8अ, जमिनीचे फेरफार, व इतर दाखले देण्याचे काम व शासकीय कामे या  तलाठ्यांना करावा लागतो त्यामुळे पावसाळ्यात हे दस्ताऐवज पाण्यापासुन जपुन ठेवता येत नाही तलाठी यांच्या कामाची दखल शासनांनी घेत नवीन तलाठी पद भरती, नवीन साझे निर्माण करण्याचे ठरविले होते त्याअनुषंगाने नवीन 6 साझे, हिरडामाली, चिचगाव, बोळुंदा, तेढा, मोहगाव तिल्ली, तुमसरचे नाव घोषीत केले पण तलाठी पद भऱती झाली नाही तलाठी यांना सुरळीत कारभार करता यावा म्हणुन शासनाच्या निदर्शनात आणण्याची कामे तलाठी करीत आहेत दिवसेंदिवस कामाचा ओझे निर्माण होत आहे.

साझे जास्त व तलाठी पद भरती कमी असल्याने एका तलाठ्याला अतीरिक्त भार पडत आहे जी तलाठी कार्यालये राजस्व उपलब्ध करवुन देतात त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे शासनांनी तलाठी पद भरती करावी, नवीन तलाठी कार्यालये इमारत देवुन शेतकऱ्यांचे महत्वाचे दस्ताऐवज सांभाळण्यास सहकार्य करावे असी मागणी होत आहे