ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन

0
5

मुबई,दि. २४- मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 63व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मलवली झाले. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवलेले होते, हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. ते गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत चांगलीच सुधारली होती. परंतु , बुधवारी प्रकृती खालवल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजार प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात व्यस्त असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला होता. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.