तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पूर्ती पब्लिक स्कुलचे सुयश

0
36

सालेकसा,दि.25ः-क्रीडा व युवक कल्याण मंडळ गोंदिया तर्फे आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत पूर्ती पब्लिक स्कुल येथील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सालेकसा महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित स्पर्धेत १४ वर्ष मुली गटात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. विजयी विद्यार्थिनींनी त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांच्या क्रीडा शिक्षक देवरे सर ह्यांना दिले आहे. विद्यार्थिनींना घडविण्यासाठी मुख्याध्यापक आर. बी. राऊत, बी. एम. राऊत,  विकास जांभुळकर, प्रज्ञा बैस, मडावी मॅडम, इडपाते मॅडम, अंकुश गुडय्या व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.