संविधान संरक्षणासाठी बहुजन समाज एकवटला;रॅली काढून नोंदविला निषेध

0
24

गोंदिया, दि.२५ : : ९ ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतरमंतरसमोर काही समाजकंटकांनी संविधानाच्या प्रती जाळल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराला सत्तारूढ शासनाचा पाठिंबा असल्याचा आरोपही झाला. याशिवाय सोशल मिडियावर त्या घटनेचे छायाचित्र व व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. एकंदरीत हा बहुजनांचा अपमान असून संविधान बदलण्याचा षड्यंत्र असल्याने या विरोधात ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांनी एकत्र येऊन संविधान बचाव कृती संघाच्या माध्यमातून संविधानाच्या संरक्षणासाठी आज (दि.२५) जनजागृती रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदविला.
संविधान बचाव कृती संघाच्या माध्यमातून काढण्यात आलेली जनजागृती रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रारंभ झाली. शहरातील जयस्तंभ चौक, गांधी
प्रतिमा, चांदणी चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक, उपविभागीय कार्यालयासमोर या रॅलीचे समापन सभेत झाले. यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सभेला संबोधित
केले. तसेच निवेदनाच्या प्रती संबंधितांना देऊन घटनेचा निषेध नोंदविला. या आंदोलनाचे सविंधान बचाव कृती समितीचे आयोजक अतुल सतदेवे, ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकरक, प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव व सपांदक खेमेंद्र कटरे, आदिवासी फेडरेशनचे डॉ. नामदेव किरसान, सहसचिव खेमेंद्र कटरे, संतोष खोब्रागडे, अवंतीबाई लोधी महासभेचे अध्यक्ष शिव नागपुरे, युवा स्वाभीमानचे जीतेश राणे, विदर्भ कनेक्टचे गुरमीत चावला,  मुस्लिम छप्पर बंद शाह बिरादरी संघटनेचे अध्यक्ष जनाब अफजल शाह,जुबेर खान, बसपाचे प्रदेश सचिव दिनेश गेडाम, बीआरएसपीचे डी.एस. मेश्राम,आम आदमी पक्षाचे पुरुषोत्तम मोदी, सविता बेदरकर,वैशाली खोब्रागडे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलास भेलावे,एस.यु.वंजारी,सावन डोये,लक्ष्मण नागपूरे,योगेश फुंडे,महेंद्र बिसेन,शिशिर कटरे,चौकलाल येडे,गुड्डू कटरे,प्रमिला रहागंडाले,दिनेश हुकरे,भुमेश्वर चव्हाण,पेमेंद्र चव्हाण,विनायक येडेवार,अशोक लंजे,डाॅ.रुपसेन बघेले, रवि भांडारकर,गणेश बरडे,चौकलाल येडे, युवा बहुजन मंचचे सुनील भोंगाडे,गौरव बिसने,प्रेमलाल साठवणे,अभिषेक चुटे, सुनील तरोणे, भाकपचे हौसलाल रहांगडाले,संतोष वैद्य, विश्वजीत बागडे, पूर्णिमा नागदेवे, अनिल गोंडाने, संजूताई खोब्रागडे, नईम खान, जीवनलाल शरणागत, भीमराव बन्सोड, एन.एल. मेश्राम, चंद्रकांत शहारे, एम.जी. गणवीर, विनोद बन्सोड, शकुंतला बोरकर, राजा चंद्रिकापुरे, कुंदा भास्कर, महेंद्र रामटेके, प्रेमलाल मेश्राम, पुरुषोत्तम नंदागवली, प्रफुल धमगाये,मेश्राम, बाबुराव जनबन्धु, अरविंद शेंडे, अनमोल भालेराव,श्याम चौरे,दिपम वासनिक, यांच्यासह विविध बहुजन संघटनांचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

त्यापुर्वी आज संविधान बचाव अभियानांतर्गत गोंदिया तालुक्यातील काटी येथून बाइक रैली पारस डोंगरे एंड भीम आर्मी ग्रुप च्यावतीने करण्यात आले होते.ती बाईक रॅली रावणवाडी,कंटगी मार्गे गोंदियात दाखल झाली.रॅलीला आम आदमी पक्षाचे पुरुषोत्तम मोदी,निलम हलमारे यांनी झेंडी दाखवली.रॅलीतील कार्यकर्त्यांना मुरपर य़ेथे विकास गेडाम,रावनवाडीत डॉ. विनोदभाऊ पटले,कटंगी चौकात जितेश टेंभरे,निलेश देशभ्रतार यांनी चहा नास्त्याची व्यवस्था करुन त्यांचे स्वागत केले.