सोयाबीनच्या शेंगा वाळून जाण्याने शेतकरी संकटात

0
6
नांदेड.दि. 27ःःहदगाव तालुक्यात अनेक गावातील शेकडो एकरावरील सोयाबीन पिकावर सध्या शेंगा वाळून जाण्याचं प्रकार मोठ्या प्रमाणमध्ये होत आहे.अचानक ओढावलेल्या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडले असून याकडे कृषी विभागाच्या आधिकारी,विद्यापीठ,व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ यांनी तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.नाहीतर शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक पूर्णत हातचे जाईल त्यामुळे या प्रकाराकडे त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडत आसल्यामुळे सोयाबीन पीक जोमदार आले आहे.हदगाव तालुक्यात मात्र शेतकऱ्यांना  वेगळ्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे.चांगले आलेले सोयाबीन पीक यावर्षी शेंगा वाळून जात असल्यामुळे झाडाच्या शेंगा पुर्णत नष्ट होत आहे वरून हिरवेगार पीक दिसत झाडा जवळ जाऊन पाहिलं असतं शेंगा वाळून जात आहे.या प्रकार मुळे शेतकरी हादरून गेला आहे.हाताला आलेलं सोयाबीन पीक जाण्याच्या मार्गावर आहे.कोणता रोग आहे यावर शेतकरी सुद्धा अनभिज्ञ आहेत.कृषी विभाग,कृषी विद्यापीठ,कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ यांनी तातडीने या रोगाची प्रत्यक्ष पाहणी करून  यावर उपाययोजना करण्या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे जेणकरून उर्वरित सोयाबीन पीक वाचण्यासाठी त्याचा फायदा होईल नाहीतर शेतकऱ्यांना त्यांचे पूर्ण पीक गमवावे लागले या बाबत कृषी विभागाच्या आधिकारी, कृषी विद्यापीठ,कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ यांनी बाबत चर्चा करून या रोगावर तातडीने उपाययोजना करण्या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे मागणी करण्यात आली असल्याचे भागवत देवसरकर यांनी सांगितले.