कलावंतांना मानधन वेळेवर मिळत नाही : चंद्रिकापुरे

0
15

सडक अर्जुनी,दि.27 : झाडीपट्टीत नाट्य, तमाशा, भजन, गोंधळ इत्यादी कला सादर होतात व ५० वर्षावरील कलाकारांना राज्य सरकारमार्फत मानधन देण्यात येते. हे मानधनसुद्धा फारच तुटपुंजे आहे. त्यात भर म्हणजे मानधन वेळेवर मिळत नाही, अशी खंत मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केली.तालुकास्तरीय शाहीर परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख वक्ते मधुकर बांते हे होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष एस. के. मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता शिवदास साखरे, सालेकसा तालुकाध्यक्ष तुकाराम बानक, मधुकर फुंडे, ओंमकर शेंडे, गुरुदेव राऊत, वंसता राऊत, माधव बोरकर, सुभाष मेश्राम, मार्कंड धनबाते, श्रीपत राणे, मुकेश गबणे, अंकोष देवरे, प्रभा शेंडे, नरेश राणे, सत्यवान परशुरामकर, प्रज्ञाशील मेश्राम आदी कलावंत उपस्थित होते. यावेळी तालुका कलावंत संघटनेचे अध्यक्ष म्हणून शिवदास साखरे यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवदास साखरे यांनी केले. संचालन मिथुन मेश्राम यांनी केले तर आभार ओमकार शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व तालुक्यातील कलावंत उपस्थित होते.