आश्रम शाळेत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू

0
22

नंदूरबार,दि.27ः- तळोदा तालुक्यात दोन शासकीय अधिकार्‍यावर हल्ला करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील सलसाडी शासकीय आश्रम शाळेत सचिन चंद्रसिंग भोरे या पाचवीतल्या विद्यार्थ्याचा विजेच्या झटक्याने मृत्यु झाला. या घटनेची पाहणी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा आणि तळोदा तहसीलदार योगेश चंद्रे हे घटनास्थळी दाखल झाले मात्र संतप्त जमावाने त्यांच्या दिशेने दगडफेक करील हल्ला केला.पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या हल्यात विनय गौडा यांना गंभीर दुखापत झाली असून दोन्ही अधिकार्याना तळोद्यात प्राथामिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही अधिका-यांची प्रकृती स्थिर आहे.नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षितेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.