रहागंडाले,बिजेवार व कापसेंना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

0
14

गोंदिया,दि.28ः- राज्यसरकारच्यावतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनी देण्यात येणार्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आली असून यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तीन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.हायस्कुल गटामध्ये राज्यस्तरीय अादर्श शिक्षक पुरस्कारासाठी विमलताई हायस्कुल कटंगीचे सहाय्यक शिक्षक मनोजकुमार लिखन रहागंडाले यांनी निवड करण्यात आली आहे.

सोबतच आदिवासी गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावली ता.देवरी चे पदवीधर शिक्षक दिपक मोतीराम कापसे आदिवासी प्राथमिक शिक्षक गटातून राज्यआदर्श शिक्षक पूरस्कारासाठी निवड झाली.तर प्राथमिक गटातून नेतराम बिजेवार  राज्यआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या सर्व शिक्षकांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.