शिक्षण विभागाचा उदासीन कारभार -पायाभूत चाचणीचे पेपर कमी

0
17
गोंदिया ,दि.२९: अध्ययन निष्पत्ती आधारित पायाभूत चाचणीचे आयोजन  संपूर्ण जिल्ह्यात आजपासून करण्यात आले. हि चाचणी २८ ते ३१ ऑगस्टपर्यंत शिक्षणाधिकारी यांच्या २३ ऑगस्टच्या पत्रानुसार सर्व गटशिक्षणाधिकारी यांना आदेश देण्यात आले.परंतु पहिल्याच दिवशी २८ ऑगस्टला सुरु झालेल्या पायाभूत चाचणीचे पेपर पटसंख्ये नुसार मिळाले नसल्यामुळे शाळेत परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाल्याचे चित्र संपुर्ण जिल्ह्यात बघावयास मिळाले.
पाकिटात पेपर द्या, पेपर परीक्षेच्या दिवशी उघडा अश्या सूचना मिळाळ्यामुळे कमी असलेल्या पेपरची छायांकित प्रत काढायला सुद्धा वेळ मिळत नाही.यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस आला आहे.शाळांनी संबंधित अधिकाèयांना,केंद्र प्रमुखांना संपर्क केले असता शिक्षण विभागाने मागणीनुसार पेपर पुरविले नाही असे उत्तरे दिली गेली.विशेष म्हणजे संबंधित पायाभूत चाचणी साठी पटसंख्येच्या माहिती जुलै महिन्यातच मागविण्यात आलेली होती.
 परंतु पुरेशा वेळ मिळूनही संबंधित विभागाची व अधिकाèयाची उदासीनता स्पष्ट दिसत आहे.गोंदियाला एक नंबर बनविण्यासाठी विविध अँप डाउनलोड करून फक्त १ नंबरच द्या अशी मागणी केली जात आहे.परंतु महाराष्ट्र शासनाच्या प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाकडे तसेच विध्यार्थी गुणवत्तेकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शसनास येत आहे.