वाचनाला पर्याय असू नये- अॅड. उके

0
11

77 व्या वाढदिवसानिमित्त शाळेला दिले ग्रंथ भेट

 

देवरी,दि.29- आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवक आणि विद्यार्थी हा दूरदर्शन आणि संगणकाच्या जाळ्यात ओढला जात आहे. मोबाईल संस्कृतीने तर युवकांची जीवनशैली पार बदलून टाकल्याचे दिसत आहे. अनेक युवकांना सामाजिक माध्यमांचे जणू वेशनच जडले आहे. परंतु, मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी आणि ज्ञानसागरात पोहू इच्छिणाऱ्यांना वाचनाशिवाय अन्य कुठलाही पर्याय असू शकत नाही. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आज वाचन संस्कृतीचा ऱ्हास होताना पाहून मनाला वेदना होतात. आपण जर वाचलोच नाही, तर वाचणार कसे? असा सवाल ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित अॅड. डॉ. श्रावण उके यांनी युवक आणि विद्यार्थ्यांना केला आहे.
ते स्थानिक छत्रपती विद्यालयात त्यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष झामसिंग येरणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे प्रा. बिसेन, प्रा. मनोज भुरे,सौै. शारदा उके, प्रशांत उके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अॅड. उके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या ग्रंथालयाला 77 ग्रंथ भेट स्वरूपात दिले. उल्लेखनीय म्हणजे अॅड. आपल्या वाढदिव
साली तालुक्यातील ग्रंथालयांना भेटस्वरुपात पुस्तके दान करीत असतात.
प्रास्ताविक आणि संचलन श्री काशिवार यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रशांत उके यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.