शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

0
10
संयोजक भागवत देवसरकर यांची माहिती.
नांदेड. दि.29;-सहकारी महर्षी,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त व शेतकरी दिनाचे औचित्य साधून जिल्हातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव,सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रविवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित कार्यक्रम मध्ये करण्यात येणार असल्याचे माहिती संयोजक तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
जिल्हातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या,नवनवीन प्रयोग करून  शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव सन्मान करण्यात येणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी शेतात प्रयोग करून यशस्वी शेती केली अश्या शेतकऱ्यांनी 31 ऑगष्ट पर्यंत शिवार पुस्तकालय वर्कशॉप नांदेड,तिरुपती अग्रो एजन्सी नवा मोंढा नांदेड येथे किंवा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील आबादार,तिरुपती पाटील भगणूरे,परमेश्वर काळे,शंकर पवार,सुनील पाटील यांचीशी संपर्क साधावा असे आवाहन भागवत देवसरकर यांनी केले आहे.