गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा प्रशासनाने सज्ज रहावे – महापौर शिला भवरे

0
48

नांदेड(नरेश तुप्तेवार)दि. २९ :  नांदेड शहरामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा प्रशासनाने सज्ज रहावे, अश्या सुचना महापौर सौ.शिला किशोर भवरे यांनी आज आढावा बैठकीत केल्या.
गोवर रुबेला लसीकरण मोहीमेबाबत शहर टास्क फोर्स कमिटीची बैठक महापौर सौ.शिला किशोर भवरे यांनी आज आपल्या कक्षात घेतली. यावेळी त्यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आवश्यक त्या पुर्वतयारीबाबतची माहिती घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या सुचना केल्या. याप्रसंगी आयुक्त लहुराज माळी,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.संगीता तुप्पेकर,माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे,उप आयुक्त विलास भोसीकर,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुमती ठाकरे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन, लसीकरण अधिकारी डॉ.बदीयोद्दीन,महिला व बालविकास विभागाचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सौ.ताडम, श्री वाघमारे व डॉ.शेख, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नोडल ऑफीसर श्री आळंदे तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ.अब्‍दुल वासे,हेमराज वाघमारे आदींची उपस्थिती होते.
लहान वयाच्या मुलांच्या मृत्यूसाठी गोवर हा प्रमुख आजार असून या आजाराची बाजारामध्ये किफायतशिर आणि सुरक्षित लस उपलब्ध असली तरीही लहान वयाच्या मुलांमध्ये या आजारामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे, रुबेला हा एक संक्रामक,सामान्यत: सौम्य वायरल संसर्ग असून तो मुख्यत्वे मुले आणि तरुण पिढीमध्ये होत असतो. तसेच गर्भवती स्त्रियांमध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मृत्यू किंवा जन्मजात दोष होवू शकते. त्यामुळे नांदेड शहरात गोवर रुबेला लसीकरण मोहीम येत्या नोव्हेंबर महिण्यामध्ये राबविण्यात येणार असून त्यासाठी शहरातील सर्व शाळा, अंगणवाडयांमधून प्रामुख्याने नऊ महिणे ते पंधरा वर्षाखालील बालकांना सदर लस देण्यात येवून या लसीकरणाच्या माध्यमातून गोवर आणि रुबेला या दोन आजारांपासून सुरक्षित करण्याचे प्रयत्न करण्यासाठी मनपाच्या आरोग्य,महिला व बालविकास विभागासह, संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधून मनपा प्रशासनाने पुर्वतयारी करुन सदरिल मोहीम यशस्वी करावी, अश्या सुचना यावेळी महापौर सौ.शिला किशोर भवरे यांनी केल्या.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.