राकाँतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

0
11

गडचिरोली,दि.30(अशोक दुर्गम) : विद्यमान केंद्र व राज्य सरकारतर्फे पेट्रोल, डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ दर महिन्यात केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. विद्यमान सरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली. या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आले. दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली.
राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांच्या नेतृत्व हे निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, सेवादलाचे प्रभारी तुकाराम पुरणवार, संजय कोचे, हबीब भाई, विद्यार्थी संघटनेचे लीलाधर भरडकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, कबीर शेख, विमल लाळवे, अनुसया गेडाम, सुनीता बन्सोड, चेतना वाघाडे, वैशाली गोरडवार, सुनीता देऊळपल्लीवार, शहर अध्यक्ष नितीन खोब्रागडे, सुरेश गिरडकर, मलय्या कालवा, विनायक झरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाने पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने  शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले. या आंदोलनादरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली. उद्योगपतींच्या हिताचे सरकार निर्णय घेत असल्याचा आरोप केला.