पर्लकोटा नदीला पूरः भामरागडच्या १०० गावांचा तुटला संपर्क

0
13
जिल्ह्यात गेल्या ४ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. भामरागड तालुक्यालगत छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस झाल्याने भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. मंगळवारी पुराचे पाणी पुलाला टेकले होते. तर, रात्रीपासून पुलावरुन ४ फूट पाणी वाहू लागले आहे. नेहमीप्रमाणे यावेळेसही पुराचे पाणी गावातील बाजारपेठेत घुसल्याने व्यापारी आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेकदा तालुक्याचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कमी उंचीचे असलेले पर्लकोटा आणि बांदिया नदीवर उंच पूल बांधावे, अशी येथील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी आहे. मात्र, सरकाराने याकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील वाहतूक नेहमीच ठप्प होत असते. तसेच आरोग्य सेवाही विस्कळीत होते.