एनएसयूआय करणार एल्गार मोर्चातून सरकारच्या धोरणाचा विरोध

0
11

गोंदिया,दि.30 : मागील चार वर्षांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार विद्यार्थीविरोधी धोरण विद्यार्थ्यांवर लादत आहे. त्यात इबीसी शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणारे पैसे विद्यार्थ्यांना अनेक महिन्यांपासून मिळत नाही. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात एनएसयूआयने एल्गार मोर्चा काढून हल्लाबोल केला. हा एल्गार मोर्चा गोंदियातून सुरू झाला असून संपूर्ण राज्यात हल्लाबोल करण्यात येणार आहे.

या एल्गार मोर्चाच्या माध्यमातून एनएसयुआयचे अध्यक्ष आमिर शेख यांनी सरकारला आवाहन केले की, विद्यार्थीविरोधी धोरण परत घेण्यात आले नाही तर राज्यभरात सरकारचा विरोध करून हा मोर्चा आक्रमक होईल व विद्यार्थीविरोधी सरकारला घराचा रस्ता दाखवेल. यावेळी मार्गदर्शन करताना प्रफुल्ल अग्रवाल यांनी एनएसयुआय रस्त्यावर उतरून सरकारच्याविरोधात न्यायहक्काची लढाई लढणार असून युवक कॉंग्रेस उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली. या मोर्चात प्रदेश उपाध्यक्ष संदीप रहांगडाले, प्रदेश सचिव निकेतन अंबादे, राकेश ठाकूर, संदीप ठाकूर, आलोक मोहंती, नितेश अग्रवाल, हरीश तुळस्कर, शकील मंसुरी, क्रांती जायस्वाल,भागवत मेश्राम, सुनील भालेराव, पराग अग्र्रवाल, देवा रूसे, गौरव वंजारी, रोहन रंगारी, सुमित महावत, निक्की येडे, कार्तिक भेलावे, तहसीम शाह, सरफराज शेख, प्रणय खोब्रागडे, संतोषी नागपुरे, सोनी सिरसे, अमित मारबान, अभिजित रघुवंशी, राहुल बावनथडे, गौरव चन्नेकर, शुभम सहारे, विक्रम यादव, कृष्णा पालांदूरकर, रोहित कोहळे, अक्षय गद्दलवार, अमन बिरीया, अंकुश कांबळे, अभिषेक वंजारी, रोहित वैद्य, अविनाश नागपुरे यांच्यासह एनएसयुआयचे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..