छत्रपती विद्यालयात गणवेश वितरण

0
20

आमगाव,दि.31ः- तालुक्यातील छत्रपती विद्यालय सीतेपार येथे गरजू विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश संस्थेकडून निशुल्क वितरण करण्यात आले.गणवेश वितरण कार्यक्रम संस्था अध्यक्ष सौ.ममता चौधरी यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी व प्रमुख अतिथी विनोद चौधरी विस्तार अधिकारी हे उपस्थित होते. हा उपक्रम दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घेण्यात आला. या कार्यक्रम करीता शाळेचे मुख्याध्यापक श्री पटले व अन्य शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.