बिलोली व्यापारी संकुल प्रकरणी अखेर जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक

0
12
  बिलोली (सय्यद रियाज) दि.३1ः- येथील व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या संदर्भात लिलाव प्रक्रिया पुर्ण करूनही व्यापाऱ्यांचा योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे या गाळ्याच्या दरा संदर्भात जिल्हाधिका-यांनी दि.३० आँगस्ट रोजी टाऊन प्लँनिंग,न.पा चे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांसमवेत नांदेड येथे बैठक घेतली असून या संदर्भात लवकरच निर्णय कळविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
    शहरातील राज्य महामार्गालगत नगर परिषदेच्या वतीने भव्य असे व्यापारी संकुल बांधन्यात आले आहे.या व्यापारी संकुलातील गाळ्याच्या संदर्भात नगर परिषदेच्या वतीने लिलाव प्रक्रीयाही राबाविण्यात आली.माञ गाळ्यांचे ठारविण्यात आलेले दर जास्तीचे असल्यामुळे व्यापाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली होती.त्यानंतर प्रशासनाच्या वतीने ५० % भाडे कमी करण्यात आले.भाड्याचे दर कमी करूनही शहरातील व्यापाराच्या दृष्टीने ते ही दर जास्त असल्यामुळे व्यापाऱ्यांचा काही प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शहर व परीसरातील व्यापाऱ्यांची गाळ्याच्या दरा संदर्भात बैठक घेण्यात येऊन या बैठकीचा इतीवृत्तांत जिल्हाधिका-यांना पाठवण्यात आला.बैठक होऊन बराच काळ लोटूनही काहीच निर्णय न झाल्याने पत्रकार श्री गोविंद मुंडकर यांच्या पुढाकाराने “व्यापारी संकुल कशाला ?” हि चळवळ उभी राहिली.दरम्यान न.पा च्या वतीने व्यापाऱ्यासोबत झालेल्या बैठकी नंतर दि.२४ आँगस्ट रोजी जिल्हाधिका-यांनी गाळ्या संदर्भात बैठक बोलावली होती.माञ काही कारणास्तव ती बैठक रद्द झाली होती.अखेर दि.३० आँगस्ट रोजी टाऊन प्लँनिग विभागाचे अधिकारी,नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाँ.ओमप्रकाश गौंड,व नगराध्यक्षा कुलकर्णी यांच्या समवेत जिल्हाधिका-यांनी बैठक घेतली.या बैठकीत व्यापारी संकुलातील गाळ्याच्या ठेव व भाडे रक्कम कमी करण्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून नगर परिषदेच्या वतीनेही आपली बाजू प्रभाविपणे मांडली असून या सकारात्मक बैठकीचा लवकरच निर्णय कळविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी ओमप्रकाश गौंड यांनी दिली आहे.