उद्या नांदेड येथे कापूस बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा व शेतकरी गौरव सोहळ्याचे आयोजन

0
28

कुलगुरू डॉ. अशोक ढवण, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट आदी मान्यवर उपस्थित राहणार
शेतकऱ्यांना फेरेमन ट्रॅप व सुरक्षा किटचे वाटप होणार

नांदेड दि. 31 – सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती व शेतकरी दिनाच्या निमित्ताने कपाशीवरील गुलाबी बोंडआळी व्यवस्थापन शेतकरी कार्यशाळा, मार्गदर्शन मेळावा व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव सोहळा उद्या रविवार, दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येेथे होणार असल्याची माहिती पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा संयोजक भागवत देवसरकर यांनी माहिती दिली आहे.
या कार्यक्रमाचे उद्‌घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण करणार असून तर अध्यक्षस्थानी कृषी विभागाचे माजी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा डॉ. रेखाताई पाटील, डॉ. पंजाबराव चव्हाण, संजय दळे पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, चक्रधर पाटील, प्रा. विवेक सुकने, गुणवंत आठरे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरूषोत्तम झंवर, डॉ. खिजर बेग उपस्थित राहणार आहेत.
मागील अनेक वर्षांपासून कृषी परिषदेच्या वतीने शेतकरी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना शेफ्टी किट, गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी फॉरेमन ट्रॅप आदींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम दोन सत्रामध्ये होणार आहे. उपस्थित शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी बरोबरच सोयाबीनवरील कर्पारोग याविषयी सखोल मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार शेतकरी बांधवांना निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या असून कार्यक्रमाची तयारी जय्यत सुरू असल्याची व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक भागवत देवसरकर यांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष धनंजय पाटील, शंकर पवार, विनीत पाटील, तिरूपती भगनुरे पाटील, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रशांत आबादार, रामदास माळेगावे, महानगराध्यक्ष परमेश्वर काळे, सदाशिव पाटील आरसुळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, मोतीराम पवार, गंगाधर पवार, तालुकाध्यक्ष नामदेव नरवाडे, संदीप पावडे, संदीप वानखेडे, शिवराज पवार, मंगेश गवळी, डॉ. गजानन शिंदे नागेलीकर, अनिल देवसरकर, शुभम शिंदे, बळवंत ताटे, अवधुत धामदरीकर, अविनाश कदम, शेख रहीम, बळवंत ताटे, शिवशंकर थोटे, सतीश चव्हाण, गोपाल कदम, दिनेश जाधव, अमोल वाघीकर, कपिल तडखिले, बालाजी पा. लखमापूरकर, संग्राम शिंदे, शरद पवार, सतीश जाधव, अमोल पाटील यांच्यासह सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.