शिक्षकांनी केला जि.प.च्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा घेराव

0
16

गोंदिया दि.३१: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे सण तौह्यार येऊनही वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य द्वारावर घेराव आंदोलन आज (दि.३१) केला. वेतनाची समस्या न सोडविल्यास ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
दर महिन्याला १ तारखेला वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने जिल्हा परिषद अध्यक्षासोबत चर्चा केली. त्यांनी दोन दिवसात या प्रकरणाचा निपटारा करू असे सांगितले. परंतु त्यांच्या आश्वासनांवर शिक्षण विभागाने काम पूर्ण केले नाही. जुलै महिन्याचे वेतन आॅगस्ट महिना संपूनही वेतन झाले नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि.३१) महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचा घेराव करण्यात आला. वेतन न झाल्यामुळे बँकेचे हप्ते, पतसंस्थेतून घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांत असंतोष आहे. शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सभा घेऊन घेराव केला. या घेराव आंदोलनात तोडगा न निघाल्यास जिल्हा परिषदेतर्फे ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिला. दरम्यान शिक्षकांच्या आंदोलनाला जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,गोंदिया पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी आंदोलक शिक्षकांच्या समस्या ऐकूण घेतल्या. तसेच शिक्षकांचे थकीत वेतन काढण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे,विभागीय प्रमुख नूतन बांगरे, जिल्हा सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, कार्याध्यक्ष यु.पी.पारधी, सुधीर बाजपेयी, नागसेन भालेराव, केदार गोटेफोडे, सुरेश रहांगडाले, एन.जे. रहांगडाले, के.एल. कटरे, एस.डी. पटले, शंकर नागपुरे, डी.झेड. लांडगे, जी. जी. दमाहे, देवेंद्र कोल्हे, पी.के. पटले, सी.एस. कोसरकर, पी.के. लोथे, प्रदीप गिºहेपुंजे, डी. आर. बनकर, एम.जी. नाकाडे, एल.टी. करंजेकर, अजय चौरे, डी.जे. परमार, एस.आर. भेलावे, वाय. बी. पटले, अशोक रावते, यशोधरा सोनवाने, बी.बी. ठाकरे, डी.एस. ढबाले, आर.जे. टेंभरे, के.आर. रहांगडाले, संजय जोगी, धनपाल पटले, ए.डी. पठाण, एम.आर. खेताडे, पी.बी. कमाने, ओमेश्वरी बिसेन, सूर्यकांता चव्हाण, आशा बागडकर व हजारो शिक्षकांचा समावेश होता.