खमारी येथे खते व बियाणांच्या गोदामाला आग

0
14

गोंदिया दि.३१: शहरापासून पाच कि.मी.अंतरावर असलेल्या खमारी येथील एका खते व बियाणांच्या गोदामाला आग लागल्याची घटना गुरूवारी (दि.३०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान अग्निशमन विभागाच्या चार तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत असली तरी ही आग लागली की लावण्यात आली यावर मात्र शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
खमारी येथे केशव खनक सीड प्रा.लि.यांचे गोंदाम आहे. या गोदामाला गुरूवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास आग लागली. दरम्यान या आगीची माहिती गोंदिया अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर ही आग ओटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दरम्यान गोदामाला आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
शुक्रवारी (दि.३१) पहाटे ४.३० वाजेपर्यंत सुरू होते. अशी माहिती प्रभारी फायर अधिकारी सी.एल.पटले यांनी दिली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकचंद भांडारकर, जितेंद्र गौर, रंजीत रहांगडाले, लोकचंद भांडारकर, महेंद्र बांते, मोनिश नागदवने, कमल राखडे, राजू शेंडे, सत्येन बिसेन, विनोद फुंडे, सैयद यांनी प्रयत्न केले.