समाजकल्याण मंत्र्याच्या जिल्ह्यात दुध उत्पादक हमीभावापासून वंचित

0
11
दुध संघ संचालक मंडळ अपात्रेतेला शासनाचा स्थगानादेश
दुध उत्पादक शेतकèयांचा आत्मदहनाचा ईशारा
गोंदिया दि.३१: जिल्हा दुध संघाकडून शासनाने ठरवून दिलेल्या २७ रुपये प्रति लिटरप्रमाणे दर न देता ५ रुपये कपात करून २२ रुपये प्रति लिटरप्रमाणे पशुपालक उत्पादकांना दुधाचे दर देत शासनाच्या हमीभावाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था(दुग्ध)नागपूरचे एस.एन.क्षिरसागर यांनी विद्यमान गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या संचालकांना कलम ७९ अ(३) अन्वये सहा वर्षासाठी २३ ऑगस्ट रोजी अपात्र ठरविले होते.त्या निर्णयाच्या विरोधात गोंदिया जिल्हा दुध संचालक मंडळाने दुग्धविकास राज्यमंत्री यांच्याकडे धाव घेत अपील केली होती.त्या अपीलावार सहकार(दुग्ध)सहसंचालक मुंबई यांनी आज शुक्रवारला(दि.३१)स्थगानादेश दिला आहे.
असे असले तरी गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी हा धानउत्पादक व दुधउत्पादक असल्याने शासकीय हमीभावानुसार त्यांना भाव देण्यात यावा ही भारतीय जनता पक्षाची नेहमीच मागणी राहिलेली आहे.अशातच गेल्या सहा सात महिने जिल्ह्यातील दुधउत्पादकांना हमीभावानुसार दुधाचे दर न मिळाल्याने हे प्रकरण गोंदिया जिल्हा दुध संघाला चांगलेच भोवले असून भाजपचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्याच जिल्ह्यातील शेतकरी हमीभावापासून वंचित असल्याचा आरोप दुधउत्पादक शेतकरी संजय बिसेन,मयाराम दसरे,परस बसेने व खेमराज राऊत यांनी पत्राद्वारे केला आहे.भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचेही यावरुन दिसत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सोबतच हमीभावाची कपात केलेली रक्कम दुध उत्पादकांना परत न केल्यास भविष्यात आत्महदन करण्याचा ईशारा पिडीत दुध उत्पादकांनी केला आहे.सोबतच दुध संघाचे जर 23 लाखाचे आर्थिक नुकसान झाले असेल तर शेतकर्यांचे 50 लाख रुपयाचा निधी का कपात केला असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
त्या अहवालाची पाहणी केल्यानंतर मात्र बिसेन यांनी संघ तोट्यात असल्यासाठी जे ताळमेळ दाखविण्यात आले.त्यामध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आले आहे.ज्या कारणामुळे संघ तोट्यात असल्याचे दाखविण्यात आले त्यामध्ये दुध संघाने ५.०१ लाख रुपयात खरेदी केलेले क्रीम हे १.११ लाख रुपयात विक्री केले.१२.५७ लाख रुपयात खरेदी केलेली पावडर १०.१५ लाख रुपयात विक्री केले.२ लाख ७६ लाख ८२२ रुपयाचे चिल्लर विक्रीचे दुध खरेदी केले मात्र त्याची विक्री ही १ लाख ६४७० रुपयात केली.तर २२ रुपये प्रती लीटर दराने खरेदी केलेला २७ हजार ०२० लीटर दुध नष्ट झाल्याने तो नष्ट करण्यासाठी २६ रुपये प्रती लीटर खर्च दाखवून दुध फेकण्याकरीता संघाला ४ रुपये लिटर खर्च अधिक कसा आला असा आरोप दुध उत्पादक शेतकèयांनी केला आहे.
विभागीय उपनिबंधकांनी बिसेन यांना दिलेल्या चौकशी अहवालात २०१६-१७ या आ्रर्थिक वर्षाच्या लेखा परिक्षणानुसार ३१.५५ लाख रुपयाचा निव्वळ तोटा होता.हा तोटा नोव्हेंबर २०१४ मध्ये दुध वितरण कमिशन ३.३५ रुपये लिटरवरुन २.५० रुपये प्रती लिटर इतका कमी केल्यामुळे वाहतुक  इतर खर्चाचे प्रमाण मिळालेल्या कमिशनपेक्षा अधिक झाल्याने संघाचे नफ्याचे प्रमाण कमी होऊन तोटा वाढला.त्यातच २०१७-१८ या आर्थिक वर्षात २२.३३ लाख रुपयाचा आर्थिक नुकसान झाल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.हा तोटा खुल्या बाजारात विक्री केलेल्या ५ लाख ३६ हजार ३८३ लीटर दुधामूळे झाल्याचे म्हटले आहे.
सोबतच या दुधउत्पादक शेतकèयांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्हा दुध संघ हा सुमारे २२ लाख ३३ हजार ८३१ रुपयाच्या तोट्यात आहे.तो तोटा भरुन काढण्यासाठी संघाने १ डिसेंबर २०१७ ते १० मे २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकèयांना प्रती लिटर ५ रुपये व ०.५० पैसे ठेव असे ५.५० रुपये प्रती लिटर शासनाच्या हमीभाव २७ रुपये असतांना २१.५० रुपये भाव देण्यात आल्याने दुध उत्पादकांची सुमारे ५० लाख रुपयाची कपात केलेली रक्कमेपासून वंचित राहावे लागले.त्यामुळे जिल्हाधिकारी,जिल्हा दुग्ध विकास अधिकारी बंड यांना तक्रार करण्यात आली असता डिडीओ भंडारा यांनी केलेल्या चौकशीत गोंदिया जिल्हा दुध संघ तोट्यात असल्यामुळे सदर रक्कम कपात करण्यात आल्याचे तक्रार दुध उत्पादक शेतकèयांना सांगण्यात आले.त्याचा चौकशी अहवाल सुध्दा संजय बिसेन या दुध उत्पादक शेतकèयाला देण्यात आला.