भंडारा शहरातील अतिक्र मणावर चालली जेसीबी

0
10

भंडारा,दि.01ः-शहरातील वाढत्या अतिक्रमणावर प्रतिबंध लावण्यासाठी नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांच्या मदतीने शुक्र वारपासून अतिक्र मण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी महात्मा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्र मण काढण्यात आले. या मोहिमेचा सर्वाधिक फटका फुटपाथधारकांना बसला असून पुनर्वसनाऐवजी वारंवार होणार्‍या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे त्यांच्यात असंतोष दिसून येत आहे.
सहा महिन्यापूर्वी शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली होती. कुणाचाही मुलाहिजा न करता अतिक्र मण हटविण्यात आल्याने शहरातील रस्ते, चौकांनी मोकळा श्‍वास घेतला होता. परंतु, त्यानंतर नियोजन नसल्याने पुन्हा अतिक्र मण वाढण्यास सुरुवात झाली व परिस्थिती ‘जैसे थे’ राहीली. त्यामुळे शहराच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली होती. आता पुन्हा नगर पालिका, बांधकाम विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे शुक्रवारपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
तत्पूर्वी नगर पालिकेने सर्व अतिक्र मणधारकांना अतिक्र मण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच जे साहित्य जप्त केले जातील, ते परत करण्यात येणार नाही, असा इशारा पालिकेने दिल्याने अनेक अतिक्रमणधारकांनी आधीच आपले अतिक्र मण काढून साहित्यांची विल्हेवाट लावली होती. शुक्र वारी सकाळी दोन जेसीबी, ट्रॅक्टर, पोलिसांचा प्रचंड फौजफाटा घेऊन ‘इन कॅमेरा’ ही मोहीम हाती घेण्यात आली. रस्त्यावर आलेले अतिक्र मण तोडण्यात आले. काही दुकानांच्या पायर्‍या रस्त्यावर असल्याने त्याही तोडण्यात आल्या. तर अनेक व्यापार्‍यांचे साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यावरील लोखंडी फलकेही तोडून रस्ता मोकळा करण्यात आला. ही मोहीम नगर पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्‍वर ढेरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.