माॅडेल कान्व्हेंटमध्ये गोपालकाला

0
33

गोरेगाव,दि.02ः- तालुक्यातील श्री तुलसी शिक्षण संस्थेच्या मॉडेल कॉन्व्हेंट अँड विज्ञान कनिष्ठ महाविद्यलाय गोरेगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त  गोपालकाला व दही हंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाला तुलसी शिक्षण संस्था गोरेगांवचे संस्थापक प्रा. आर डी कटरे उपस्थित होते.विध्यार्थी विद्यार्थीनी राधा कृष्णच्या वेशभुशेमध्ये कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या हस्ते दही हंडी फोडण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.