पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीविरोधात भव्य मोर्चा

0
8

भंडारा,दि.02 : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केंद्र शासनाने पेट्रोल – डिझेल व गॅसवर केलेल्या दरवाढीचा मोर्चा काढून निषेध करण्यात आला व भाववाढ त्वरित मागे घेण्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत देण्यात आले.सर्व सामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारने मागील एका वर्षात पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरात नित्याने भाववाढ केली आहे.दररोज पेट्रोल-डिझेल व गॅसच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे गरीब, शेतकरी, शेतमजूर व व्यापारी व सर्व सामान्यांमध्ये केंद्र सरकारबाबत असंतोष निर्माण झालेला आहे. या निषेधार्त राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार मधुकर कुकडे, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, अनिल बावनकर, विजय खेडीकर, अभिषेक कारेमोरे, नरेंद्र झंझाड, देवचंद ठाकरे, विवेकानंद कुर्झेकर, धनेंद्र तुरकर, विठ्ठलराव कहालकर, डॉ.विकास गभणे, स्वप्निल, नशीने, डॉ.रवींद्र वानखेडे, महेंद्र गडकरी, ॲड.विनयमोहन पशिने, नितीन तुमाने, अरुण अंबादे, भोजराज वाघमारे, जुगल भोंगाडे, रेखा ठाकरे, नितीन खेडीकर, राजकुमार माटे इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.