सुरक्षा आयुक्तांनी केली गोंदिया-समनापूर मार्गाची पाहणी

0
7

गोंदिया,दि.02ः- रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी गोंदिया-समनापूरपर्यंत सुरू असलेल्या रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी केली. एका विशेष रेल्वेगाडीने दिल्ली येथील सुरक्षा विषयक अधिकारी गोंदिया येथे गुरूवारी (दि.३0) आले होते. त्यानंतर ही चमू गोंदियावरून समनापूर येथे गेली.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळातंर्गत गोंदिया ते जबलपूर या रेल्वे मागार्चे नॅरोगेजमधून ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू झाल्यानंतर गोंदिया ते जबलपूर थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गोंदिया ते समनापूरपर्यत ब्राडगेजचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर या मार्गावर रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. आता या मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
यासर्व कामाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी (दि.३0) रेल्वेचे सुरक्षा आयुक्त आपल्या चमूसह एका विशेष गाडीने गोंदिया येथे आले होते. रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर गोंदिया- समनापूर मार्गावरील विद्युतवरील रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे. सुरक्षा आयुक्तांनी बिरसोला व बालाघाट येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केली. तेथील कामाचा आढावा अधिकार्‍यांकडून घेतला. यावेळी त्यांच्यासोबत नागपूरच्या डीआरएम शोभना बंडोपाध्याय व अधिकारी उपस्थित होते.