हेडाऊ कुटुंबातील महिला मंगला हेडाऊ या सकाळी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेल्या असता, विहिरीतून वाफ निघत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी लगेच ही घटना घरातील सदस्यांच्या कानावर घातली. त्यावेळी राजु हेडाऊ यांनी विहिरीतून बादलीत काढलेल्या पाण्यात हात घालून पाहिले असता, ते पाणी गरम असल्याचे त्यांना जाणवले.
या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी हेडाऊ यांच्या विहिरीजवळ गर्दी केली. ऐन पासाळ्यात विहिरीतून गरम पाणी निघत असल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.