उपाेषणकर्त्या 3 रोजगारसेवकांची प्रकृती खालावली

0
12
सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत काम करणारे एकूण ५३ रोजगार सेवक आहेत. तसेच बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार हा मुख्यतः ग्राम रोजगार सेवकांवर असतो. या कामाच्या मोबदल्यात त्यांना दरमहा शासनातर्फे मानधन मिळत असते. मात्र असे असले तरी पंचायत समितीच्या तांत्रिक चुकीमुळे त्यांना तब्बल १७ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी व उपसभापती यांनी केलेली चर्चाही निष्फळ ठरली आहे.
त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे दिवस आले आहेत. यासाठी अखेर रोजगार सेवकांनी थेट पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असून उपोषणादरम्यान तिघांची प्रकृती गंभीर आहे.यावेळी जोपर्यंत त्यांच्या खात्यावर मानधन जमा होणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे देण्यात आला.