जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २ तक्रारींचा निपटारा

0
9

वाशिम, दि. ०३ : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर रोजी झालेल्या सप्टेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २ तक्रारींचा निपटारा झाला. या लोकशाही दिनात ४ तक्रारी दाखल झाल्या.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्यासह सर्व तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी लोकशाही दिनातील प्रलंबित तक्रारी तसेच ई-लोकशाही कक्षामध्ये दाखल झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनात व ई-लोकशाही कक्षात दाखल झालेल्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी याव्लेई दिल्या.