१७ सप्टेंबर पुर्वी सिमावर्ती प्रश्ना संबंधी बैठक घेणार- जिल्हाधिकारी अरूण डोंगरे

0
8
बिलोली  ( सय्यद रियाज ) सिमावर्ती भागातील गावक-यांच्या विविध प्रश्नां संबंधी येत्या १७ सप्टेंबर पुर्वी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे बिलोली येथे बैठक घेणार असल्याची माहिती समन्वयकांशी भ्रमणध्वणी द्वारे बोलताना दिली.
   महाराष्ट्र तेलंगणा या दोन राज्याच्या सिमेवर असलेल्या बिलोली तालुक्यातील सिमा भागातील गावे आजही अनेक मुलभूत सोई सुविधांपासून वंचित आहेत.लगतच्या तेलंगणा राज्यातील शासन तेथील नागरिकांना सर्व सोई सुविधा पुरविण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज व पाण्याच्या सोई बरोबरच इतरही चांगल्या योजना राबत आहे.महाराष्ट्रातील शेवटच्या गावा पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणात चांगल्या सोई सुविधा मिळत असताना बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागातील गावांमधील नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे.या प्रश्नी तालुक्यातील काही समन्वयकांनी एकत्र येऊन प्रश्न सिमावर्ती भागाचे हि चळवळ सुरू केली असून या भागातील समस्यांचे पुढ्या-यांसह जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना निवेदन देण्यात आले आहे.सिमा भागातील गावच्या नागरिकांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी हे गत महिन्यात बिलोली येथे सिमावर्ती प्रश्नावर बिलोली येथे बैठक घेणार होते.माञ गत महिन्यातील विविध आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेमुळे हि बैठक पुढे ढकलण्यात आली होती.दि.२ सप्टेंबर रोजी प्रश्न सिमावर्ती भागाचे या विषयाच्या समन्वयक गोविंद मुंडकर, गंगाधर प्रंचड,राजेंद्र पाटील शिंदे,राजू पाटील,व्यंकट पाटील,जावेद सेठ,गट्टुवार आदींनी व्हीडीयो काँन्फर्सिंग द्वारे चर्चा करण्यात आली.यावेळी प्रमुख समन्वयक तथा पञकार गोविंद मुंडकर यांनी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याशी भ्रमणध्वणी द्वारे संपर्क साधला असता जिल्हाधिकारी डोंगरे यांनी येत्या १७ सप्टेंबर पुर्वी प्रश्न सिमावर्ती भागाचे या विषयी बिलोली येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे.