आयटकने दिले तहसिलदारांना निवेदन

0
10

गोरेगाव,दि.०४- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँगेस(आयटक)च्या गोरेगाव शाखेच्यावतीने शेतमजूर,अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या समस्यांना घेऊन आज तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.या मोच्र्याचे नेतृत्व हौसलाल रहागंडाले,रामचंद्र पाटील,शालून कुथे,कल्पना डोंगरे,अंजना ठाकरे,भुनेश्वरी रहागंडाले,चरणदास भावे,दुलीचंद कावडे यांनी केले.अंगणवाडी सेविका व मदतनिसांना १८ हजार रुपये मासिक वेतन व ३ हजार रुपये पेंशन लागू करण्यात यावे.ग्रामपंचायत कर्मचाèयांना चतुर्थ श्रेणी कर्मचारीचा दर्जा देण्यात यावे.हमाल कामगारांना पेंशन व वेतन लागू करण्यात यावे.पेट्रोल,डिझेलचे दर कमी करण्यात यावे.शेतमजूरांना २०० दिवस कामाची हमी देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.