शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख खासदार कीर्तीकर बुधवारला गोंदियात

0
19

गोंदिया, दि. 4:- : शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख खासदार गजानन कीर्तीकर हे मंगळवारपासून पूर्व विदर्भाच्या दौèयावर आले असून या भेटीत ते नागपूर शहर,वर्धा,रामटेक,भंडारा-गोंदिया व चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकत्र्यासोंबच बैठक व चर्चा करणार आहेत.
खासदार कीर्तीकर हे बुधवारला सायकांळी ३ वाजता गोंदिया येथे येणार असून गुर्जर समाजवाडी येथे आयोजित भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी,बुथकमिटी,शिवसेनेचे आजी माजी लोकप्रतिनिधी,जिल्हाप्रमुखासंह शिवसैनिकांशी सवांद साधणार आहेत.त्यानंतर सायंकाळी ५ वाजता विश्रामगृहात पत्रकारांशी चर्चा करणार असल्याची माहिती गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी दिली.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते,शिवसैनिकांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासदार कीर्तीकर यांच्यासोबत नवनियुक्त खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार आशिष जायस्वाल हे सुध्दा उपस्थित राहणार आहेत. लोकसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे, यांनी केले आहे. ७सप्टेंबरला दुपारी १:०० वाजता गडचिरोली – चिमूर (चिमूर, ब्रम्हपुरी व आमगाव विधानसभा सहित) लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, अंगीकृत संघटना शिवसैनिक बूथप्रमुखांचा (पुरुष/महिला) मेळाव्याला ते गडचिरोली येथे मार्गदर्शन करणार आहेत.