सार्वजनिक बांधकाम विभागात डांबर घोटाळा;6 कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल

0
13

नांदेड ,दि. 4:– सार्वजनिक बांधकाम विभागातील कामामध्ये कंत्राटदारांनी डांबर घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये डांबर खरेदीची बोगस बीले सादर करुन शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी ६ कंत्राटदारांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शासनाच्या निर्देशानुसार २०१० ते ११ या काळात डांबर खरेदीसाठी शासनाने काही कंपन्या निर्देशीत केल्या होत्या. मात्र, कंत्राटदारांनी या कंपन्यांकडून डांबर खरेदी न करता अन्य खासगी कंपन्यांकडून डांबर खरेदी केले. एवढेच नाहीतर, शासननिर्देशीत कंपन्यांकडूनच डांबर खेरदी केल्याच्या बोगस पावत्या सादर केल्या. कागदोपत्री डांबराची खेरदी दाखवण्यात आली. सहायक अभियंता संदीप कोटलवार यांच्या तक्रारीवरुन ६ कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यामध्ये निखिला कंन्स्ट्रक्शनचे भास्कर कोंडा, मोरे कंन्स्ट्रक्शनचे मनोज मोरे, एस.जी.पद्मावार, सोनाई कंन्स्ट्रक्शनचे सतीश देशमुख, सी.एस.संत्रे कंन्स्ट्रक्शन, नुसरत कंन्स्ट्रक्शनचे प्रो.प्रा.मोईज यांचा समावेश आहे. यापैकी भास्कर कोंडा आणि मनोज मोरे यांना अटक करण्यात आली. शासनाची फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, शासनाच्या निधीचा अपव्यय करणे असे वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम.टी. सुरवसे यांनी दिली.