सण,उत्सव व पर्यावरणावर चर्चा

0
19
गोंदिया,दि.05: पोवार प्रगतीशील मंचच्यावतीने पोवार सांस्कृतीक भवन कन्हारटोली येथे दर रविवारला स्वच्छता व श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गतच २ सप्टेंबरला पर्यावरण आणि त्यौहार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
गोंदिया येथील प्रसिद्ध डॉ. चंद्रशेखर राणा यांनी पर्यावरणपूरक सन उत्सव साजरे करणे आवश्यक झाले असून प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळण्याचे आवाहन केले. यावेळी प्रगतीशील शेतकरी महेंद्र ठाकुर यांनी बायोवेस्ट व केमीकलच्या वापरावर माहिती देत हे सर्व आपणच टाळण्यासाठी सजग होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सांस्कृतीक भवनातील झाडाकरिता गांढूळ खत उपलब्ध करुन दिले. प्राकृतीक रंगाचा वापर करत सन उत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन केले. कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी पवार प्रगतीशील मंचाचे अध्यक्ष डॉ. कैलाशचंद्र हरिणखेडे हे होते. प्रास्तावीक व संचालन सचिव डॉ. संजीव रहांगडाले यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. चंद्रशेखर राणा, महेंद्र ठाकुर, खेमेन्द्र कटरे, शिशिर कटरे, महेंद्र बिसेन यांनी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. कैलाशचंद्र हरिणखेडे, संजय रांहागडाले,अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, सुरेश भक्तवरती, किशोर भगत, सुरेश पटले, हुपेन्द्र बोपचे, भागचंद रांहागडाले, सि. पी. बिसेन, पारखदास पटले, डॉ प्रिती देशमुख, सौ. आशु रांहागडाले, डॉ छाया पटले, पंकज पटले, छत्रपाल चौधरी, ओमेद रांहागडाले उपस्थित