राम कदमच्या फोटोला गोंदिया शिवसेनेने फासले काळे

0
17

गोंदिया,दि.06 -मुंबई येथील घाटकोपर येथे भाजपचे राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात उत्साहाच्याभरात ‘तुम्हाला पसंत असलेली मुलगी पळवून आणेन आणि तुम्हाला देईन’ असं भयंकर वक्तव्य केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. त्यातच राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने करण्यात येत असून शिवसेनेच्या महिला कार्यकर्ता व पदाधिकारी राम कदम यांच्या प्रतिकात्मक फोटोला शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे, शिवसेनेच्या महिला जिला संघठक सुरेखा चव्हाण, उपजिल्हा संघटक इंद्रमणि मरुबन, तालुका संघटक गायत्री सरकार, विधानसभा संघटक दिल्लू गुप्ता, उपतालुका प्रमुख अरुण हिरापुरे, युवा सेना तालुका उपाधिकारी अमोल दमाहे, शहर उपप्रमुख राजू नागरिकर एवं शिवसैनिकांच्या उपस्थितीत काळे फासून जो़डे चप्पलांनी मारण्यात आले.

राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना चप्पल काढून मारावे वाटते, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच फक्त माफी चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील शिवहरे यांनी केली आहे.‘एखाद्या मुलीला प्रपोज केले असता ती नाही म्हणत असेल तर तुमच्या आई वडिलांना समोर आणा व त्यांचा नकार असला तर तिला पळवून आणा’ असे वक्तव्य हरामखोर आमदार राम कदम यांनी  केले होते