रोजगार सेवकांनी रोहयोचा विकास आराखडा तयार करावा-चंद्रिकापुरे

0
11

सडक अर्जुनी,दि.06ः- तालुक्यातील कोहमारा येथे  सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या सभेत ग्रामरोजगार सेवकांनी गावाच्या विकासासाठी रोजगार हमी योजनेचा विकास आराखडा तयार करुन विकासासाठी पुढाकार घ्यावे असे विचार सेवानिवृत्त कृषि अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.गाव विकास आराखडा,रोहयोची कामे, विविध विभागाचा सहभाग तसेच वार्षिक रोहयोचे नियोजन कसे करावे याबद्दल चंद्रिकापुरे यांनी अध्यक्षस्थानावरून सविस्तार मार्गदर्शन केले. मंचावर सरपंच दिनेश कोरे, ग्रामपंचायत सदस्य निशांत राऊत उपस्थित होते. गेल्या 4 ते 5 महिन्यापासुन तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांना मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने ते मानधन शासनाने त्वरीत द्यावे अशी मागणीही करण्यात आली. यावेळी तालुक्यातील राजकुमार सोनवाणे,शैलेश मेश्राम,शरयुकुमार बिसेन,युवराज मानकर,घनश्याम शिवणकर,विश्वनाथ तरोणे,मानिक बनकर विवेक मेंढे,सुधीर लेदे,आर.एस.नान्हे,नरेश मेश्राम,देवचंद नागोसे,विलास उईक,किशन बारापात्रे,राकेश्वर गायधने,दिगबंर कोहरे,गुरुचरण टेंभुर्णे,घनश्याम भोंडे,ॠषी मेश्राम,वीरेंद्र तागडे,वनमाला ईरले,मीनाक्षी साखरे,अनिल मडावी,रुवचंद कावळे,एम.जी. रोकडे,गजानन लाडे,तेजराम मेश्राम,दुलिचंद मुंगमोडे,तीर्थराज चचेरे,डेगेश्वर बघेले,सुभाष मलगाम,देवेन्द्र शहारे,आको चांदेवार,उदाराम कटरे,हेमराज भेंडारकर,विलास गजबे,सचिन डोंगरे,किशन बिसेन,ताराचंद सेंदरे,भगवान कापगते ईत्यादि रोजगार सेवक उपस्थित होते. संचालन शैलेश मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक घनश्याम शिवणकर यांनी केले तर आभार देवचंद नागोसे यांनी मानले.