इंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त

0
12

सिरोंचा दि.७ :- २२ घनमिटरचे ९० सागवानी लठ्ठे तस्करी करीत असताना आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाºयांनी जप्त केल्याची घटना काल ५ सप्टेंबर रोजी इंद्रावती नदीपात्रात घडली.आसरअल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया सोमनूर (बोन्तामाडूगल कॅम्प) येथे ९० सागवानी लठ्ठे पकडण्यात वनविभागाच्या अधिकाºयांना यश आले आहे. सदर सागवानी लठ्ठे जवळपास २२ घनमिटरचे आहेत. मागील २ ते ३ महिन्यांपासून जवळपास ५५ घनमिटरचे ४०० सागवानी लठ्ठे आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाने पडकले आहेत. पावसाळी हंगामामध्ये इंद्रावती नदीपात्रातून सागवान तस्करी केली जाते. त्यावर प्रतिबंध करण्यासाठी सदर ठिकाणी १५ संरक्षण मजूर तैनात असून २ डिझेल इंजिन बोट गस्तीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
आॅगस्ट महिन्यामध्ये सोमनूर कॅम्पमध्ये ३३ सागवानी लठ्ठ्यांसोबत एक आरोपी पकडण्यात आला होता. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. सदर कॅम्पवर आसरअल्ली परिक्षेत्राचे वनरक्षक, वनपाल दररोज दिवसरात्र गस्ती करीत असतात. सदर सागवान लाकूड कुठून तोडण्यात आले व आरोप कोण, याचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.सदर कारवाई उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार, क्षेत्रसहाय्यक नवघरे, वनरक्षक ईरकीवार, चिचघरे, हलामी, मडावी व मजुरांनी केली.