उस्मानाबाद एस.टी महामंडळाचा मनमानी कारभार

0
12
उस्मानाबाद( मन्सुर सय्यद) दि. ०७ : उस्मानाबाद मध्यवर्ती बस स्थानकात मासिक पास काढण्यासाठी दूर खेड्याहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने त्रास देऊन कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार चालविल्याने असतोंष उफाळून आला आहे.गावखेड्यातून येणारे विद्यार्थी सकाळी 8 वाजेपासून पासेसकरीता रांगेत उभे असतात.त्या विद्यार्थानी मागितलेला  फार्म न देता उस्मानाबाद एसटी आगारातील कर्मचारी त्या विद्यार्थ्यांना दुपारी 2 वाजता या नंतर असे सांगून परत पाठवतो.तर दुपारी 2 वाजता गेल्यावर दुसर्यादिवशी सकाळी 10 वाजता या असे सांगून दररोज टाळाटाळ करीत असल्याने विद्यार्थ्यामध्ये आगारप्रमुख व कर्मचार्याबद्दल मोठा असंतोष उफाळून आला आहे.