संविधान सम्मान संमेलन, राज्यातील मुस्लिम ओबीसी मुंबईत

0
17

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) ,दि.0८ः- :– मुस्लिम ओबीसी समाज जागृत करण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने संविधान सम्मान संमेलन दि. 11 सप्टेंबर रोजी मुंबईतील बिर्ला हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनात पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी, राज्यातील तमाम पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे संघटनेचे सचिव शाहरुख मुलाणी यांनी सांगितले.
संघटनेचे सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की, आज मुस्लिम समाजासाठी अनेक योजना आहेत, शासनातील यंत्रणा ही मुस्लिम ओबीसी समाजापर्यंत पोहचण्यास कमी पडत आहे. त्यामुळे संघटनेस असे संमेलन घेण्याची गरज पडत आहे. अनेक गी. आर तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत नाहीत. समाज जागृत झाला पाहिजे. समाजाला योजना काळल्या पाहीजेत त्याच्या उपयोग झाला पाहिजे. अनेक वेळा असे निदर्शनास आले आहे की, शासनाच्या योजना फक्त शासन दफ्तरी राहतात. अश्यावेळी समाजावर अन्याय होतो. “सबका साथ सबका विकास” मग मुस्लिम समाजावर दुर्लक्ष का ? असा प्रश्न मुलाणी यांनी उपस्थित केला.