विकास कामांचे सादरीकरण करा

0
14

भंडारा,दि.08 : सन २०१८-१९ साठी सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना (क्षेत्रबाहय) अशा तीनही योजना मिळून २०३ कोटी नियतव्यय मंजूर आहे. जिल्हयासाठी जिल्हा नियोजनमध्ये शासनाने ४० कोटी रूपयांची वाढ दिली आहे. हा सर्व निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हयात होणाऱ्या विकास कामाचे सादरीकरण पुढील बैठकीत प्रत्येक विभागाने करावे, असे निर्देश जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विकास कामाचे छायाचित्र व जिओ टॅगिंग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, खासदार मधुकर कुकडे, आमदार सर्वश्री चरण वाघमारे, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते.
विभाग प्रमुखांनी जिल्हा नियोजनाच्या सर्व कामांचे प्रस्ताव २० आॅगस्ट पुर्वी सादर करण्याच्या सूचना देवून ही अजून पर्यंत अनेक विभागाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रस्ताव सादर करण्यास २० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. त्यानंतर येणारे प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाही. विलंब झाल्यास संबंधित अधिकाºयांच्या गोपनीय अहवालात तशा प्रकारची नोंद घेवून कार्यवाही करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. अखर्चित खचार्चा तपशिल कारणांसह सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.