पोलीस अधिक्षकाच्या निवासस्थानातील चंदनाच्या झाडाची चोरी

0
28

यवतमाळ,दि.08 : जिल्हा पोलीस अधिक्षकाच्या निवासस्थानातील दोन चंदनाची झाडे कापुन चोरून नेल्याची घटना दोन दिवसापुर्वी घडली. आणि तातडीने पोलीस दलाची सूत्रे हलली आणि पहाटेपर्यंत चोरट्यांना अटकही करण्यात आली.अशीच तरपरता  सामान्य नागरिकांच्या बाबतीत घडलेल्या घटनेत पोलीस दल का दाखवीत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. चंदन चोरीची घटना आहे ही जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या शासकीय निवासस्थानातील. मात्र, या बाबीची कुठेही वाच्छता होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षकानी विषेश खबरदारी घेतली. शहर पोलीसांनी गोपनीयता पाळत चंदनाची झाडे कापुन चोरून नेणार्या चोरंट्याना ताब्यात घेतले.

माहीतीनुसार हॅलीपॅड ग्राऊन्ड बाजुला जिल्हा पोलीस अधिक्षकाचे शासकीय निवासस्थान असुन या निवास्थानात दोन दिवसापुर्वी मध्यरात्री प्रवेश करून निवासस्थानातील पाच वर्षाचे दोन चंदनाची चंदनाची झाडे आरीने कापुन नेली. सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी पाहीले असता चंदनाची झाडे चोरी झाल्याचे दिसले.या ठिकाणी केवळ चंदनाची थुट मिळुण आल्याने सुरक्षा रक्षकाला याबाबत विचारणा केली असता काहीच माहीत नसल्याचे सांगीतले. त्यावरून संबधीत सुरक्षा रक्षकाने गार्ड ड्युटी करीत असताना अनोळखी ईसमाने शासकीय निवासस्थानात प्रवेश करून गार्डण मधील दोन चंदनाची झाडे कापुन चोरून नेल्याची तक्रार नोदंवुन पोलींसानी तपास सुरू केला असता जालना जिल्हातील कठोरा बाजार येथील आरोपी राजु शेख व ईम्राण खान यांना पोंलीसानी ताब्यात घेवुन चौकशी केली. त्यांनी मध्यरात्री बंगल्यात शिरून चंदनाची झाडे चोरून नेल्याची कबुली दिली. त्यावरून आज पोलींसानी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या  निवास्थनाला चारही बाजुने कडेकोट बंदोबस्त असताना चोरंट्यानी प्रवेश करून निवासस्थानातील वृक्ष चोरून नेल्याने सर्व सामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. थेट जिल्हाच्या पोलीस अधिक्षक यांच्या घरीच चोरट्यानी डल्ला मारल्याने सर्व सामान्य नांगरीकाचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे