गपूरकडून जबलपूरला जाणाऱ्या ट्रकचा वाहतूक पोलीस पाठलाग करत होते. यादरम्यान पोलिसांची गाडी अचानक समोर आल्याने चालकाने ट्रक बाजुच्या लेनकडे वळविला. नेमका त्याच वेळेस समोरून येणाऱ्या ट्रकची त्या ट्रकला धडक बसली. या दोन ट्रकची धडक झाल्यानंतर एका टँकरची त्या ट्रकांना धडक बसली. अपघात एवढा भीषण होता, की दोन वाहने एकमेकांत अडकून एक ट्रक रस्त्यावर उलटला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४ किमीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. क्रेनच्या मदतीने हे ट्रक वेगळे करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.अपघातानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. हा अपघात वाहतूक पोलिसांच्या चुकीमुळेच झाला असून त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.