अंगणवाडी सेविकांचा न्याय्य हक्कांसाठी जेलभरो

0
22

भंडारा,दि.09 : अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी व बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शनिवारी आयटकच्या पुढाकाराने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत अपमानास्पद बोलल्याबाबद आयटकने जोडे मारो आंदोलनही यावेळी केले. केंद्र शासनाने योजना कामगारांसाठी या अंतर्गत ना.अरुण जेटली यांनी १७ आॅगस्ट २०१६ रोजी अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार, आशा वर्कर यांना प्रतीदिन ३५० रुपये वेतन व गटप्रवर्तक ४५० रुपये, ईपीएफ व आरोग्य सुविधा लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही शासनादेश निघालेला नाही. त्यासंदर्भात आयटक प्रणित अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनीयन, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनीयन जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला. तसेच जवाब दो व जेलभरो आंदोलन करण्यात आले. तसेच महिला विषयी अपशब्द बोलणाºया भाजप आमदार राम कदम यांना अटक करा अशी मागणीही करण्यात आली. यावेळी अंगणवाडी कर्मचारी युनीयनचे कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांच्यासह शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, सविता लुटे, आशिषा मेश्राम, भाग्यश्री उरकुडे, सदानंद इलमे, गजानन लाडसे, गजानन पाचे, किसनाताई भानारकर, अलका बोरकर, मंगल गजभिये, रिता लोखंडे, मंगला रंगारी आदींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.