काँग्रेसच्या भारत बंदमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद सहभागी

0
11
नांदेड. दि 9- पेट्रोल डिझेल,घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर,जीवनआवश्यक वस्तूचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.महागाई वाढत असल्याचा निषेर्धात केंद्र सरकारच्या विरोधात आज सोमवारी काँग्रेस ने भारत बंदची घोषणा केली आहे,भारत बंद मध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
मागील चार वर्षे पासून भाजप सरकार च्या काळात महागाई ने उच्चांक गाठला आहे.दिवस न दिवस पेट्रोल डिझेल,व इतर जीवनाश्यक वस्तु च्या किमती गगनाला भिडत आहेत.या दरवाढीमुले सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडत आहे.यावर नियंत्रण ठेवण्यास केंद्र सरकार अपयशी ठरत आहे.याच्या विरोधात काँग्रसने भारत बंदची हाक दिली आहे.नांदेड जिल्ह्यात कृषी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करावा व बंद शांततेत संयमाने करावा असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर, विभागीय अध्यक्ष तिरुपती भगणूरे पाटील,जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील आबादार,रामदास पाटील माळेगावे यांनी केले आहे