विविध मागण्यांसाठी ‘आयटक’ ने काढला मोर्चा

0
10

गोंदिया,दि.09ः-अंगणवाडी कर्मचारी, आशा पोषण आहार कर्मचारी यांना १८ हजार मासिक वेतन, ३ हजार मासिक पेंशन लागू करा, वाढत्या महागाईवर नियंत्रण, पेट्रोल, डीझल, केरोसीन, गैसची भाववाढ परत घ्यावी आदी मागण्यांना घेऊन ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक तर्फे ८ सप्टेंबर रोजी शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शहरातील प्रमुख मागार्ने होत उपविभागीय कार्यालयासमोर येऊन धडकला. यावेळी आंदोलन करण्यात आले व उपविभागीय अधिकार्‍यांना मागण्याचे निवेदन सोपविण्यात आले.
ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेसच्या ८ सप्टेंबरच्या देशव्यापी आंदोलनातर्गत हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात मोदी हटाओ देश बचाओ, संविधान बचाओ, कामगार बचाओ, कर्मचारी बचाओ अशी नारेबाजी करण्यात आली. मोर्चात आंगनवाडी कर्मचारी, आशा पोषण आहार कर्मचारी आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदन देतांना प्रामुख्याने आयटकचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र पाटील, जिल्हा सचिव मिलिंद गणवीर, शालू कुथे, करूणा गणवीर, शेखर कनौजिया, शकुंतला फटींग, सुनीता मलगाम, वीणा गौतम, वीटा पवार, जीवनकला वैद्य, कल्पना डोंगरे, प्रल्हाद उके, चरनदास भावे आदी उपस्थित होते. याप्रसंगी हौसलाल रहांगडाले यांनी ८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणार्‍या भारतीय कम्युनिस्ट पार्टी महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित राज्यव्यापी आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.